एटीएमचा पासवर्डच्या मदतीने तरूणीची २५ हजार फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पायी जाणाऱ्या तरूणीच्या हरविलेल्या पाकिटातील एटीएम कार्डवर पासवर्डच्या मदतीने अज्ञात व्यक्तीने परस्पर २५ हजाराची रोकड काढून फसवणूक केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील दिपाली भिकन चौधरी ही तरुणी शिक्षण घेत असून ती शहरातील टागोर नगरात वास्तव्यास आहे. शिक्षणासोबत पार्टटाईम वकीलांकडे जॉब करते. ३१ जुलै रोजी तरूणी तहसील कार्यालयाकडे गेली होती. काम आटोपून दिपाली चौधरी या शिवाजीनगरकडे जात असतांना त्यांच्याकडील पाकीट कुठेतरी हरविले. त्यात एटीएम कार्ड होते आणि त्यावर एटीएमचा पासवर्ड देखील लिहीलेला होता. काही वेळानंतर पाकीट हरविल्याचे दिपाली चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला. मात्र त्यांना पाकीट मिळून आले नाही. काळी वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर दोन मॅसेज आले. त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ५०० रूपयांची रोकड अज्ञाताने परस्पर काढून घेतली. तरूणीने तातडीने शहर पोलिसात धाव घेत लेखी तक्रार दिली होती. दिपाली चौधरी यांनी घटना घडल्यानंतर लागलीच शहर पोलिसात लेखी तक्रार दिली होती. परंतु महिनाभरात पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दरम्यान, महिनाभरानंतर वरिष्ठांच्या सूचनेवरुन मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content