थोरगव्हाण रस्त्यावर चक्क टाकली जातेय माती व वरून दगडांचा खच ..!

जळगाव, प्रतिनिधी । सावदा- थोरगव्हाण या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट अवस्था झाली असून चक्क मातीच रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे दृश्य आहे .
खरोखरच या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सावदयाहून थोरगव्हाणपर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ट्रॅक्टर ,ट्रक ,वाहन,मोटार सायकल चालविणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक वेळा वाहन स्लीप होण्याच्या घटना घडत असून काही जण वाहनावरून पडल्याने जखमी झाले आहेत .तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे .अनेक वाहन चालक या रस्त्यावर घसरत आहेत .या मार्गावर दररोज ये-जा करणारे शेकडो शेतकरी बांधव व इतर वाहन चालक कसे येत जात असतील ही बाबही चिंताजनक आहे. माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेश वानखेडे यांनीही या समस्येप्रश्नी आता आवाज उठविला आहे.काही समाजकंटक या रस्त्याबद्दल राजकारण करत असल्याचीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम होत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.एरवी रस्त्यांची कामे ही उन्हाळ्यात व हिवाळ्यात होत असतात. या रस्त्याची काय अवस्था याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. रस्त्याचे काम सुरूच झाले आहे तर ते लवकर आणि चांगल्या दर्जाचे व्हावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे रस्ता तयार करताना खडीवर डांबरऐवजी चक्क माती टाकली जात आहे. या रस्त्यावर डांबर टाकले ही जाईल की नाही ? असाही प्रश्न अनेकांना पडलेला दिसून येत आहे. पावसाळा संपण्याआधीच हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Protected Content