जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवानात विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आढावा बैठक घेण्यात आली.

आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पकंज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात सध्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, लम्पी स्कीन आजारावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाकडून १ कोटी रूपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ५६५ जनावरे लम्पी स्कीन आजाराने बाधित आहे. यापैकी ३६३ जनावरे बरी झाली असून २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराने बाधित असलेले १७९ जनावरांवर उपचार सुरू आहे. यानंतर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याच्या सुचना मंडळाधिकारी व तलाठी यांना देण्यात आले आहे. यासह विद्यूत पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण, कृषी उत्पन्न बाजार समिती, रस्त्यांच्या समस्यांसह नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहे.

 

 

Protected Content