कास्ट्राईब वन कर्मचारीची कार्यकारिणी जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल चोपडा मार्गावरील प्रादेशिक वनविभागाच्या कार्यालयातील सभागृहात कास्ट्राईब संघटनेच्या बैठकीत जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी विकास सोनवणे तर सचिवपदी योगीराज तेली यांची निवड करण्यात आली.

राज्यस्तरीय संघटना पदाधिकारी प्रमुख प्रवक्ते सुमित भुईगड, व्ही.जी. जाधव , मनोज वाघमारे यांनी उपस्थित राहुन वन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाध्यपदी विकास सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नोकेश बोरसे, जिल्हा सचिव योगीराज तेली, कोषाध्यक्षपदी अनिल पाटील, सहसचिव राकेश निकुंभे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सविता वाघ आणि हनुमंत सोनवणे तर संघटकपदी प्रमिला मराठे, सरला भोंगरे, सोनाली बारेला, सुमित भुईगड यांची निवड करण्यात आली. याकार्यक्रमाला प्रमुख अतिथीम्हणून वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगड, राज्य उपाध्यक्ष व्ही.जी. जाधव, औरंगाबादचे कार्याध्यक्ष मनोज कांबळे, वरीष्ठा मार्गदर्शक डी.एस.थोरात यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र राणे, सह सचिव योगेश अडकमोल यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट्राईब वन कर्मचारी जिल्हा संघटनाची कार्यकारणी गठीत करण्यात आली व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content