राज वाईनमध्ये आढळल्या मुदतबाह्य बिअरच्या बाटल्या

एक्स्पायरी डेटच्या बीयरच्या १२४ बाटल्या अन् दहा टीनचे डबे जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका ठिकाणी काही तरुण बियर होत होते , यादरम्यान बीयर पीताच एका तरुणाला उलटी झाल्याची घटना बुधवार, ७ सप्टेंबर रोजी घडली. यानंतर तरुणांनी बियरची बाटली तपासली असता ती मुदतबाह्य असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या कारवाई शहरात खळबळ उडाली आहे.

तरुणांच्या तक्रारीनंतर उत्पादक शुल्क विभागाने संबंधित जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज वाईनवर कारवाई केली आहे. या कारवाईत दुकानात अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले असून सदरचा माल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बिअर पीत होते. त्यातील एका तरुणाला बिअर पिल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बिअरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली. त्यानंतर भरारी पथकाचे सी.एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिती यांच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारींकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती भरारी पथकातील सी.एच. पाटील यांनी दिली आहे.

Protected Content