बकालेंच्या अटकेसाठी शुक्रवारी भव्य मोर्चा ! (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यात उमटले आहे. बकाले यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी विविध संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून मागणी केली आहे.

 

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपुर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयात बकालेंचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला आहे. या अनुषंगाने  बकालेंना अटक करावी अशी मागणी अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषद केली.

अशोक शिंदे म्हणाले की, निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या घटनेचा जवळपास महिना होत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या अनुषंगाने शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात यावी या  मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोर्चाला गवळी समाज संघटना, जळगाव जिल्हा धनगर समाज, हिंदू टायगर, हिंदू पॅथर , माता मनूदेवी संस्था यांनी पाठींबा दिला आहे.  दरम्यान, या मोर्चानंतर बकालेला अटक केली नाही तर राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Protected Content