फैजपूर येथे पथविक्रेता समितलाभ सभा उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  फैजपूर नगरपरिषदचा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी शहर पथविक्रेता समितलाभ सभा आयोजित करण्यात आलेली होती.

शहरातील फेरीवाल्यांचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार शासनाने विकसित केलेल्या मोबाईल ॲप द्वारे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात 321 पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आलेली असून पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

सदर योजने अंतर्गत १) शहरी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे २) सर्वांना ओळखपत्रचे वाटप करणे ३) फेरीवाल्यांच्या आर्थिक विकास करणे ४) शहर फेरीवाला आराखडा तयार करणे ५) फेरीवाल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे ६)फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकास करणे. अशा कामी सर्वेक्षण पूर्ण केलेल्या पथ विक्रेत्यांचे यादीत नाव नसल्यास अथवा त्यांच्या काही हरकती/सुचना असल्यास 12 ऑक्टोबर2022 पर्यंत यांनी लेखी स्वरूपात अर्ज करावेत, असे पालिकेतर्फे कळविण्यात आलेले आहे. पथविक्रेत्यांच्या नावाची प्रारूप यादी पूर्ण तपशिलासह पालिकेच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे.

या सभेस फैजपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे अध्यक्षस्थानी होते. तसेच समितीचे सदस्य फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर तसेच (सहा. पोलीस इन्स्पेक्टर )मोहन गिरधर लोखंडे, डॉ.मुद्दसर नजर अब्दुल नबी, संगिता बाक्षे, (करनिरिक्षक,) शेख फारुकी, नगररचना बांधकाम अभियंता उल्हास चौधरी (उपाध्यक्ष), ज्येष्ठ नागरिक मंडळ सुधाकर चौधरी, गणेश चौधरी विविध संस्थेचे अध्यक्ष फेरीवाले सदस्य, रहीमूदिदन विद्या सरोदे उपस्थित होते. DAY-NULM विभागाचे प्रवीण सपकाळे सहा. प्रकल्प अधिकारी यांनी प्रास्ताविक करून सदर सभेचा समारोप केला.

Protected Content