जामनेरात बचत गट महिलांतर्फे प्लास्टिक बंदी व स्वच्छता अभियान

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० व स्वच्छतेचा पंधरवडा अंतर्गत जामनेर नगररिषद अंतर्गत बचत गटातील महिलांन मार्फत प्लॅस्टिक बंदीसंबंधी जनजागृती करण्यासाठी कापडी पिशव्या विक्री केंद्र उभारून कापडी पिशव्यांची विक्री करण्यात आली.

यावेळी नगरअध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, डॉ.प्रशांत भोंडे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी ई. उपस्थित होते. नगरपालिकेच्या माध्यमातून माजी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2023 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जात असून शहरात नगरपालिका मार्फत जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

 

Protected Content