विस्तारीत वसाहतीत पाणी पुरवठ्यासाठी शिवसेनेचे उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विस्तारित वस्त्यांमध्ये नव्यानेच केलेल्या पाणी वितरीकेतून नागरिकांना योग्य दाबाने तर काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने संबंधित ठेकेदारावर वरील कारवाईच्या मागणीसह पाणीपुरवठा सुरळीत होईस्तोवर पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे उपोषणास करण्यात आले.

 

याप्रसंगी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी उपोषणार्थींची  भेट घेत केलेल्या यशस्वी चर्चेअंती  योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यावरून शिवसैनिकांनी  उपोषण स्थगित केले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरालगत असलेल्या नविन विस्तारित वस्त्यांमध्ये दुसर्‍या मजल्यापर्यंत विना मोटारीने पाणी पोहोचेल असे पालिकेकडून आश्वासन देत पालिकेकडून गेल्यावर्षीच लाखो रुपयांची पाणी  वितरिका टाकण्यात आली आहे मात्र या वितरीकेतून विस्तारीत क्षेत्रातील वसाहतीमधील नागरिकांना योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या येथील शहर शिवसेनेच्या वतीने गेल्या आठवड्यात पालिकेला कंत्राटदारावर कडक कारवाईच्या मागणीसह  जोपर्यंत वस्तीधारकांना पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार सोमवारी येथील यावल नगर परिषद समोर शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, पप्पू जोशी, शरद कोळी, सागर देवांग ,बाळासाहेब कोलते , सुनील बारी, पिंटू कुंभार, विजय पंडित, विकी बाविस्कर, सारंग बेहेडे, मयूर खर्चे , निलेश पानसरे, हुसेन तडवी, भुरा कुंभार, डॉ.विवेक अडकमोल यांचेसह शिवसैनिकांनी उपोषणास सुरुवात केली  असता  मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी उपोषणार्थींशी  चर्चा करत विस्तारित भागातील पाणीपुरवठा सुरळीत करून संबंधित ठेकेदाराला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा सुरळीत करताना पालिकेचे खोदले जाणारे रस्त्यांचे बाबत कोणतेही अतिरिक्तदेयके  अदा करण्यात येणार नसल्याचेही आश्वासन पत्रात नमूद केले आहे या चर्चेनंतर शिवसैनिकांनी आपले उपोषण स्थगित केले आहे .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!