कॉम्प्लेक्सची पडदी कोसळली; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अभिनव शाळेसमोरील रजनीगंधा कॉम्पलेक्सची पदडी जीर्ण झालेली पडदी पावसामुळे पडल्याची घटना सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाची दुखापत झाली नाही. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही

 

याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील अभिनव शाळेसमोर रजनीगंधा कॉम्पलेक्स आहे. या कॉम्पलेक्सची पडदी पुर्णपणे जीर्ण झालेली होती. रविवारी १९ जून रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पाणी साचले गेल्याने सोमवारी २० जून रोजी सायकाळी ६ वाजेच्या सुमारास  रजनीगंधा कॉम्पलेक्सची पडदी कोसळली. सुदैवाने कॉम्पलेक्सच्या खाली असलेल्या दुकानांवर एकही ग्राहक नसल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच या पडदीवर एका डॉक्टरकडून एससीचे मशिन बसविले होते. दरम्यान पडदी पडल्यामुळे ते मशिन देखील कोसळून नुकसान झाले आहे. याघटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!