एकनाथ खडसे समर्थकांचा टरबूज फोडून आनंदोत्सव !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांनाच एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी विधान भवन परिसरात टरबूज फोडून जल्लोष साजरा केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांच्या समर्थकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. ते विजयी होणार अशी अपेक्षा असल्याने समर्थक मोठ्या संख्येने कालपासूनच मुंबईत दाखल झाले होते. तर आज सकाळी अजून जास्त समर्थक मुंबईत दाखल झाले.

दरम्यान, आज सायंकाळी उशीरा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खडसे यांच्या समर्थकांनी विधान भवन परिसरातच जल्लोष करण्यास प्रारंभ केला. याप्रसंगी अनेक समर्थकांनी टरबूज घेऊन याला रोडावर आपटून जोरदार घोषणाबाजी केली. तर मुक्ताईनगर शहरात देखील खडसे यांच्या समर्थकांनी याच प्रकारे टरबूज फोडून आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: