Home राजकीय केंद्राने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली

केंद्राने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली

0
119


नवी दिल्ली, वृत्तसेवा | माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना देण्यात आलेली ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे. मनमोहन सिंह यांना आता केवळ ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला असलेल्या धोक्याच्या आधारावर कोणतीही सुरक्षा  देण्यात येते. सुरक्षा यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे त्यात वेळोवेळी आवश्यक तो बदल म्हणजे त्यात वाढ किंवा कपात करण्यात येत असते.  मनमोहन यांच्या सुरक्षेतील कपात हा याच नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.  मनमोहन यांनी सहाव्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ २३ ऑगस्ट रोजी घेतली. राजस्थानच्या कोट्यातून काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. भाजपनं विरोधात उमेदवार न दिल्यानं मनमोहन यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी तब्बल २८ वर्षे मनमोहन यांनी राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व केले होते. सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound