Home Cities जळगाव नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांसाठी अभिनव अभियान

नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांसाठी अभिनव अभियान

0
32


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अभिनव अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या सातबारा वरील पोटखराब क्षेत्र वहिती क्षेत्रात आणण्यासाठी शासकीय अर्ज भरून देण्यात आले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या शेतीच्या किंमतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोटखराब क्षेत्र, वर्ग अ लागवडीखाली असल्यास वहिती क्षेत्रात समायोजन होण्यासाठी, शासनाच्या नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष विनोद रंधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नशिराबाद शहराध्यक्ष निलेश रोटे, देवेंद्र पाटील, शेखर पाटील, संकेत तळेले, सय्यद काझीम, खगेश कावळे, पुष्कराज रोटे, ललित रोटे, रमेश पाटील, किरण डॉक्टर, विकास पाटील, हर्षल वाघुळदे, पराग कोल्हे, शशिकांत येवले, प्रवीण पाटील, प्रसाद राणे यांनी परिश्रम घेतले.

सदर शासकीय निर्णय व्यापक स्वरूपात राबवण्यात आल्याने या अभिनव अभियानास जळगाव तहसीलदार नामदेव पाटील ,नायब तहसीलदार सोनवणे, मंडळाधिकारी आशिष वाघ, नशिराबाद तलाठी रुपेश ठाकूर, संतोष कोळी, वसीम आली यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भोई, प्रकाश माळी यांचे अनमोल सहकार्य मिळाले.


Protected Content

Play sound