जळगावात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल अंजली येथे अनोळखी अंदाजे ४५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील टॉवर चौक परिसरातील हॉटेल अंजली जवळ एका अनोळखी अंदाजे ४५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली. यावेळी परिसरातील नागरीकांनी तातडीने शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ संजय झाल्टे, पो.ना. पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणे गुंडे यांनी मयत घोषीत केले. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे.

Protected Content