यावल महाविद्यालयात आ. सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट

यावल प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी सदिच्छा भेट दिली.

 

यावेळी महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या मतदानाच्या हक्का संदर्भातसा सविस्तर माहीती दिली व विविध विषयावर जनजागृती  करून मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रार्चाया डॉ . संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम .डी .खैरनार यांनी शिक्षक आमदार सुधीर तांबे यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे  प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा.ए.पी. पाटील, प्रा. संजय पाटील, प्रा . मुकेश येवले ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती .

Protected Content