यावल महाविद्यालयात कोरोना व ओमायक्रॉनबाबत जनजागृती व मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी  कोरोना व ओमायक्रॉनबाबत जनजागृती व मार्गदर्शनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

यावल येथे महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला, विज्ञान व किमान कौशल्य वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कोरोनाच्या आणी ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे, नेहमी मास्क वापरावे व आपल्या हाताला नेहमी सॅनिटायझर करावे, आपले हात वारंवार डिटोल साबणाने धुणे  व स्वतःच्या आरोग्याची व आपल्या कुटुंबातीत मंडळीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. या कोरोना व ओमायक्रॉन या संसर्गजन्य आजाराविषयी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील हे उपस्थित होते.  मार्गदर्शन कार्यक्रमास यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content