आयएमआरमध्ये ‘ऑनलाईन व्यक्तीमत्त्व विकास’ कार्यशाळा. 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आणि आयएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला आयएमआरच्या प्राचार्या प्रा. डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी मार्गदर्शन केलं.

डॉ. बेंडाळे म्हणाल्या की, “व्यक्तीगत विकासातून सामाजिक विकासाचा मार्ग सापडतो.. आणि हाच मार्ग पुढे अध्यात्मिक विकासाच्या टप्प्यावरुन राष्ट्रीय विकासापर्यत पोहोचतो.”त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रो पी पी माहुलिकर म्हणालेत की “कोविड 19 ही उपलब्ध संधी समजून तिचा उपयोग करुन घ्या. विद्यापिठामार्फत विविध बेविनार च्या माध्यमातुन अनेक तज्ञ, अनुभवी, वक्ते तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपलब्ध होत आहेत. हि लाॅकडाऊन मधील उत्तम संधी आहे तिचा फायदा करुन तुमच्या व्यक्तीमत्वाला उन्नत करा. तुम्ही एका संगमरवरासारखे आहात.. त्याचा रंग रुप घटक बदलणार नाही पण त्यातुनच छान मुर्तीत तुम्ही स्वतःला रुपांतरीत करु शकतात.

आता आपण कुठे आहात? आपल्याला पुढच्या किती वर्षांत कुठे पोहोचणे आवश्यक आहे? आणि कुठे पोहोचवायची आपली इच्छा आहे? याचा नीट विचार करा, त्या दृष्टीकोनातून तुमचे ज्ञान, वर्तणूक, कौशल्य, त्याला पुरक ठरणाऱ्या तुमच्या सवई, त्याला मारक ठरणाऱ्या तुमच्या सवई, लक्षात घ्या. नंतर तुमची स्टॅटेजी ठरवा. जेव्हा तुम्ही इन्टरव्हू ला जातात तेव्हा पर्यत तुम्हाला कळत नाही की किती ज्ञान तुम्ही मिळवले आहे.  विचारशक्ती योग्य ठिकाणी फोकस करा, पॉवर ऑफ थिंकिंग ओळखा. पुस्तके वाचा. निरीक्षण वाढेल. याप्रसंगी पाहुण्यांची ओळख आणि आभार डॉ ममता दहाड यांनी मानले तर टेक्निकल सपोर्ट एस.एम.खान आणि अमोल पांडे यांनी दिला.

Protected Content