सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या; पाच जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवर व्हिडीओ टाकून ख्रिश्चन धर्मियांचा भावना दुखविल्याचा प्रकार शनिवारी २५ डिसेंबर रोजी ८ वाजता घडला. याप्रकरणी पाच जणांविरोधात रविवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी  जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, बहिणाबाई उद्यानाजवळील बेबी किडस् शॉप येथे ख्रिसमस निमित्त सांताक्लॉजचे कपडे घातलेला एक व्यक्ती लहान मुलांना चॉकलेट देतांना आणि मिकी माऊसचे कपडे घातलेले दोन व्यक्ती आणि देखावा करण्यात आलेला होता. २५ डिसेंबर रोजी  रात्री ८ वाजेच्या सुमारास लहान मुले व इतर काही नागरीक देखाव्याचा आनंद घेत असतांना मोगली बाबा उर्फ राहूल ठाकरे रा. वाल्मिक नगर, निलू आबा उर्फ निलेश युवराज सपकाळे रा. दिनकर नगर, अजय मंधान रा. सिंधी कॉलनी, जळगाव, हितेश बागुल रा. पिंप्राळा आणि सुशिल इंगळे रा. पिंप्राळा अश्या पाच जणांनी मोठ मोठ्याने ओरडून देखावा बंद करण्याचे सांगितले. देखाव्यातील सांताक्लॉजचे फोमचे पोस्टर काढून दुकानासमोरील रस्त्यावर फेकून दिले. हा प्रकार एकाने व्हिडीओ रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकला त्यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखविले, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवार २६ डिसेंबर रोजी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content