प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करा – डॉ. पाटील

WhatsApp Image 2019 09 30 at 5.24.37 PM

धरणगाव, प्रतिनिधी | प्लास्टिक अतिवापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. ग्राहकांसह किरकोळ व्यापारी यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची सवय जडली आहे. प्लास्टिक बंदीचे प्रबोधन खऱ्या अर्थाने विद्यार्थी करू शकतात. यासाठी प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होऊन समाजात जनजागृती करण्याचे काम करा असे आवाहन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचे उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील यांनी केले. महाविद्यालय आणि पी. आर. हायस्कूलचे एनसीसी युनिट ने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 

यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापर आणि बंदी बाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक संजय अमृतकर, पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे, जिल्हा पतपेढीचे संचालक शरद कुमार बंसी, राजेश खैरे आदी उपस्थित होते. डॉ. किशोर पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपले घर, परिसर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा ध्यास घेतला तर हा उपक्रम सहज साध्य होऊ शकतो. रस्त्यावर फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाउच, थरमाकोल आदी वस्तू उचलणे आणि टाकणारा दिसला तर त्याला सामंजस्याने हटकने, मना करणे ही जबाबदारी प्रत्येकाने उचलू या आणि शासनाच्या मोहिमेला यशस्वी करू या असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.चौधरी यांनी प्लास्टिक निर्मतीपासून वापर आणि आरोग्यावरील घातक परिणाम याची माहिती देऊन प्लास्टिक व रबर यांच्यातील फरक समजावून दिला. तसेच आजपासून शाळेत विद्यार्थ्यांसह सर्वांनीच , प्लास्टिक वस्तू, पिशवी , बुके असे कोणतेही प्लास्टिकचा वापर करायचा नाही,करू देणार नाहीत असा संकल्प केला. यावेळी प्लास्टिक वापराचे दुष्परिणामाबाबत डॉ. संजीवकुमार सोनवणे, संजय अमृतकर यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन मेजर डी. एस. पाटील यांनी तर आभार शरद कुमार बंसी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिनियर व ज्युनिअर डिविजनमधील एनसीसी कॅडेट्स कावेरी पाटील, तेजल दाभाडे, गौरव ब्राह्मणे, प्रथमेश सोनार यांच्यासह योगेश नाईक, मिलिंद हींगोनेकर, जितेंद्र दाभाडे यांनी प्रयत्न केले
.

Protected Content