Home Cities धरणगाव रस्त्यांबाबत राज्यमंत्री ना.पाटील यांचा दावा फोल : सोनवद ग्रामस्थांचा आरोप (व्हिडीओ)

रस्त्यांबाबत राज्यमंत्री ना.पाटील यांचा दावा फोल : सोनवद ग्रामस्थांचा आरोप (व्हिडीओ)

0
107


sonvad road

 

सोनवद, प्रतिनिधी |  येथून बाभूळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. आपल्या मतदार संघात गाव-शिवारापर्यंत रस्ते बनवण्याचा दावा करणाऱ्या राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना हा रस्ता कसा दिसला नाही ? त्यांचा दावा फोल आहे, असा आरोप सोनवदच्या ग्रामस्थांनी केला आहे.

 

याबाबत येथील उपसरपंच निर्दोष पवार म्हणाले की, या रस्त्यावरून वावरणाऱ्या वाहनधारकांना त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार केली पण दुरुस्ती झाली नाही. या रस्त्यावरून राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नेहमी ये-जा करीत असतात. पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. ते तर या रस्त्यावरून खरोखर जातात की नाही? याचीच मला शंका वाटते. हा रस्ता त्वरित दुरुस्त झाला नाही तर सोनवद, बाभूळगावसह परिसरातील ग्रामस्थ रस्ता बंद करून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

 


Protected Content

Play sound