किनगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात सन-१९९६ साली इयत्ता दहावी तील शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा संपन्न तिस वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी व्यक्त केल्या आपल्या शालेय जिवनातील कौटुंबीक भावनिक आठवणींना उजाळा दिला.

 

किनगाव येथील नेहरू विद्यालयात ८ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी सन- १९९६ या शैक्षणीक वर्षात इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थीनींनसह त्यावेळी सेवेत असलेले शिक्षकही उपस्थीत होते. धावपळीच्या जिवनात जुन्या गोष्टींना उजाळा मिळावा, या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दहावी नंतर पुढील शिक्षण करून प्रगतशील शेतकरी, शिक्षण, ग्रामसेवक, पोलिस सह ईतर विविध क्षेत्रात कार्येरत असलेले विद्यार्थी व विद्यार्थीनींनी व्सनमुक्तीसह विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना व वृक्षारोपणही केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.बी.पाटील हे होते तर आर.एस.पाटील, बी.डी.देशमुख, आर.एस. पाटील, एस.पी.पाटील मँडम, अहिरे सर, जि.एस. साळूंखे सर, सि.के.पाटील सर इ.शिक्षकांनसह मयुर बियाणी, विवेक पाटील, ललिता पवार, शारदा पाटील, आशा साळुंके, निता खुरपडे, सायरा पटेल, जागृती चौधरी, आशा नेहते, शिरीष पाटील, रवि सपकाळे, विजय सपकाळे, अरविंद पवार, प्रकाश पवार, मुकेश पाटील, तुषार पाटील, किरण साळवे, विनोद तायडे, संभाजी पालवे, विकास पाटील, सुरेश भोई, बळीराम बारेला, मुस्तफा तडवी, अरब तडवी, योगेश पाटील, योगेश मिस्त्री, बळीराम साळूंखे, संतोष कोळी, विशाल साळुंखे यांच्यासह  १२ विद्यार्थीनी व ५८ माजी विद्यार्थी उपस्थीत होते.

Protected Content