तांडव वेबसिरीजवर बंदीची हिन्दु जनजागृती समितीची मागणी

 

 यावल : प्रतिनिधी । हिन्दु देवतांचा अवमान करणाऱ्या व जातीयद्वेष पसरवणाऱ्या तांडव वेबसिरीजवर बंदी आणुन दोषींवर कारवाईची मागणी हिन्दु जनजागृती समितीने केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .

आज यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर .के. पवार यांना दिलेल्या निवेदनात हिन्दु जनजागृती समितीने म्हटले आहे की , अॅमेझॉन प्राईम वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान , डिपंल कपाडीया, मोहम्मद जिशान, अय्युब , गौहर खान यांची भुमीका असलेली अली अब्बास जफर दिग्दर्शित ही वेबसिरीज प्रसारीत झाली आहे . या वेबसिरीजमध्ये शिव आणी श्रीराम यांच्या विषयी आक्षेपार्ह संवाद दाखवुन अवमान करण्यात आला आहे . पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमाणे व्यक्तिरेखा दाखवुन त्यांचाही अपमान केलेला आहे . कन्हैयाकुमार आणी तत्सम घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

या वेबसिरीज मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्यात आले असुन पंतप्रधानाच्या मुलाच्या सांगण्यावरून आंदोलनातील तिन मुस्लमान युवकांचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलीसांना सांगीतले जाते . यापैक्की दोन मुसलमान युवकांना पोलीस ठार करतात यातुन वर्तमान सत्ताधारी मुसलमांनाची हत्या घडवत असल्याचा संदेश देण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. तिसरा मुसलमान युवक उमर खालीद याच्या प्रमाणे व्याक्तीरेखा असलेला दाखवला असुन तो आंदोलन स्थळावरून विवेकानंद विश्वविद्यालयात ( व्हीएनयु ) जातो . त्याला आंतकवादी असल्याचे सांगत पोलीस उचलुन घेवुन जातात . या प्रसंगात व्हीएनयु हे जेएनयुप्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे . यातून जेएनयुमध्ये झालेल्या देशद्रोही कृत्यांचे एका प्रकारे समर्थन करत , देशद्रोही विद्यार्थ्यावर कसा अन्याय केला गेला हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे .

या निवेदनावर हिन्दु जनजागृती समितीचे धिरज भोळे, प्रशांत जुवेकर , चेतन भोईटे , हेमंत बडगुजर , चंदु बडगुजर , शिवाजी बारी , धनराज कोळी , लखननाथ यांच्या सह्या आहेत .

Protected Content