जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या प्रलंबित कामासंदर्भात खा. रक्षा खडसें यांनी घेतला आढावा

 

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या प्रलंबित कामासंदर्भात खासदार रक्षा खडसेंचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत बैठक दिलेत. 

मागील चार वर्षांपासून प्रगती पथावर असलेल्या जळगाव-औरंगाबाद महार्गाचे बरेचसे काम प्रलंबित आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर रस्त्याचे अंतिम टप्प्यात असलेले काम लवकरात लवकर पूर्ण होणे बाबत खासदार रक्षा खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी निर्देश दिले. जळगाव-औरंगाबाद हा द्विपदरी महामार्ग बनविण्याचे ठरले होते. परंतु, जळगाव-औरंगाबाद मार्गावर जास्त रहदारी होत असल्यामुळे भविष्यातील रहदारी विना अडथळा होण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांनी द्विपदरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मान्यता मिळाली.

जळगाव-औरंगाबाद मार्गे पुणे-नगर येथपर्यंत पुढील प्रवास करणाऱ्या वाहनांमार्फत या रस्त्याचा प्रचंड प्रमाणात उपयोग करण्यात येतो. त्यामुळे या रस्त्याची उपयोगिता आणि वैशिष्ट्यता काही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पहूर गाव हे व्यवसायाच्या दृष्टीने आणि इतर मूलभूत घटकांमुळे केंद्रस्थान बनले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी पहूर येथे मोठे जंगशन डेव्हलोपमेंटसह गाववस्तीच्या वापरासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड बनविण्यासंदर्भात प्रस्ताव केंद्राला खासदारांनी दिलेला असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे. असे खासदारांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुचविलेले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करतांना प्रस्तावित कामासाठी नियोजनबद्ध कामकाज करण्यात यावे. यासोबतच जळगाव-औरंगाबाद महार्गाची अजिंठा लेणी घाटातील रस्त्याची अत्यंत खराब दुर्दशा झालेली आहे. घाटातील रस्ता हा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत येत असल्यामुळे या मार्गाचे काम रखडलेले होते. याबाबत फॉरेस्ट डिपार्टमेंटनेही आता सकारात्मक भूमिका घेऊन जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणात रखडलेल्या कामांना हिरवी झेंडी दिली आहे. अशी माहिती महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता जळगाव-औरंगाबाद महामार्गास गती मिळून लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे असे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले. या सोबतच महार्गाचे काम दर्जेदार करण्यासंदर्भात खासदारांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. महामार्ग प्रलंबित कामकाज आढावा बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे एसपीएम. पी. एस. श्रीनिवास, ऑथॉरिटी इंजिनिअर एस. एल भगत, प्रोजेक्ट इंजिनिअर आर.एन. प्रसाद, सीएस. संदीप पाटील, एसडीओ. तृप्ती घोडमिसे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते

Protected Content