आपल्याला आणखी एक स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल- खा. राऊत

  इडीच्या आडून लोकशाहीचा गळा घोटण्याच्या कामामुळे स्वातंत्र्याचा पराभव असल्याचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई/ लखनौ, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या तीन दिवसांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी केली जात असून  केंद्र सरकारकडून इडीच्या आडून लोकशाहीचा गळा घोटण्याचेच काम केले जात आहे. भारतात लोकशाही असली इडीमुळे  स्वातंत्र्याचा पराभवच झाला असून आपल्याला आणखी एक स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल, असा हल्लाबोल शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून देशात अनेक राजकीय विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रसरकारच्या आकसबुद्धीने इडीकडून कारवाई केली जात आहे. नाही म्हटले तरी यामुळे राज्यसभा निवडणुकीत दोन मते गमावत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. तर कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवसांपासून ईडीतर्फे चौकशी सुरू आहे.
ईडीच्या कारवाईबाबत खा. संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना किंवा इतर कोणत्याही पक्षाचे जे लोक परखड भूमिका मांडतात, पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सर्वांनाच अशा सगळ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय सूड, राजकीय बदला, राजकीय द्वेष उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.
‘केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करणे, ही हुकूमशाहीची सुरुवात नसून ते हुकूमशाहीचे एक टोक आहे. सत्ता टिकवण्यासाठी हिटलरने देखील राजकीय विरोधकांना अशा जुलमी पद्धतीने संपवण्याचं काम केले नसेल. अशाप्रकारे भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करीत असून हा आपल्या स्वातंत्र्याचा पराभव आहे, त्यामुळे आपल्याला आणखी एक स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. अशी स्थिती निर्माण झाली असल्याची टीका खा. राऊतांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!