कोरपावली येथे हजरत पीर गैबनशाह बाबा यांच्या उर्स निमित्ताने कव्वालीचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील राष्ट्रीय एकतेचे प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध व असंख्य हिंदु-मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर गैबनशाह बाबा उर्स साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली या गावातील गजबजलेल्या मुख्य चौकात प्रसिद्ध असलेल्या हजरत पीर गैबनशाह बाबा यांच्या दर्गावरील उर्स पारंपारिक पद्धतीने मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

सोमवार १६  जानेवारी २०२४ रोजी संदल कार्यक्रम होणार असून, तर मंगळवार १७ जानेवारी २०२४ रोजी दिल्लीचे ‘अजमेर चलो ए दिवाने  ‘ प्रसिद्ध कव्वाल अक्रम अस्लम साबरी व औरंगाबादच्या प्रसिद्ध फनकारा परवीन तब्स्सून यांच्यात गायनाच्या कार्यक्रमाची जुगलबंदीचा कव्वाली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी पंचक्रोशितील सर्व धर्मीय भाविकांनी श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबनशाह बाबा यांच्या दर्गावरील दर्शन संदल व कव्वालीच्या कार्यक्रमात उपस्थित आनंद लुटावा असे आवाहन  येथील हिन्दु- मुस्लीम पंच कमेटी कोरपावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content