रेडक्रॉस सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेडक्रॉस, जळगाव वर्धापन दिनानिमित्त आज दुपारी ठीक ४ वाजता रेडक्रॉस भवन येथे वार्ताहर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजना संदर्भात माहिती सांगण्यात आली.

याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसची स्थापनेपासून ते अजतायागत रेडक्रॉस करीत असलेल्या सेवाकार्याची माहिती सांगत रेडक्रॉसच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. १३ जुलै रोजी आयोजीत विविध उपक्रमाची माहिती दिली.

रेडक्रॉस व सेवारथ परिवार, जळगावतर्फे रेडक्रॉस दवाखान्याचे उद्घाटन दिनांक १३ जुलै रोजी रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते होणार आहे. याची माहिती देवून या दवाखान्यामार्फत विविध रुग्णसेवेची अत्यल्प दरात सेवा देण्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली. यात तपासणी फी रु.२०,  तपासणी अधिक इंजेक्शन रु.४०, वाफ देणे रु.२०, ड्रेसिंग करणे रु.३०, ई.सी.जी. तपासणी रु.८०, रक्तातील शुगर तपासणी एक वेळेची रु.४०, सलाईन (लहान सलाईन सह)रु.७०, सलाईन (मोठी सलाईन सह) रु.१००. सलाईन (मोठी सलाईन सह) रु.१५० असे दर निर्धारित केलेले असल्याचे सांगितले.

बुधवार, दि. १३ जुलै रोजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे हस्ते खोटेनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार असल्याचे रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी सांगितले. याप्रसंगी रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी गुणवत्ता युक्त अशी रक्त घटक रुग्णाना रक्तकेंद्रामार्फत दिली जाते. NAT टेस्ट रक्त चाचणी प्रणालीचा अवलंब करून जगातील अति सुरक्षित रक्तघटक १०० टक्के देण्याचा संकल्प केलेला आहे त्या करीता गरीब व गरजू रूग्णांना प्रत्येक NAT टेस्टेड रक्तघटकास ३०० रुपयाची सवलत योजनेमार्फत पुरवली जाते. त्यामुळे जगातील सर्वात सुरक्षित रक्त घटकाचा पुरवठा होतो.

रेडक्रॉस वर्धापन दिनानिमित्त उपक्रम –

१. रेडक्रॉस दवाखाना – अल्पदरात तपासणी, उपचार व औषधी उद्घाटन रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते पिंप्राळातील ओम शांती नगरात बुधवार, दि १३ जुलै, २०२२ रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता संपन्न होणार आहे.

२. शहरातील खोटे नगर परिसरात बुधवार, दि १३ जुलै, २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

३. ‘रेडक्रॉस रक्तकेंद्र, जळगाव’ येथे दि. १३ जुलै २०२२ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/437718208236486  

Protected Content