पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ्यात काही एक कारण नसतांना प्रौढाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पिंप्राळ्यात महाराणा प्रताप चौकात भरतसिंग नरसिंग पाटील वय ४० हे राहतात. ते मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील शिवाजी चौकात असतांना काही एक कारण नसतांना त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका मुलाने रस्त्यावर पडलेला दगड भरतसिंग यांच्या गालावर मारुन दुखातप केली. अशा आशयाच्या भरतसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कालसिंग बारेला हे करीत आहेत.

Protected Content