चाळीसगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून महिला कोरोना योद्धांचा गौरव

चाळीसगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा बुधवार १० जून या दिवशी २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात कार्यकर्ते साजरा करीत आहेत. दरम्यान, राज्यावर आलेल्या कोरोना या महामारीच्या संकटात ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणून महत्वाची भूमिका बजावली अश्या महिलांसाठी “मर्दानी महाराष्ट्राची ” हे अभियान राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राबविले जात असून याअंतर्गत या महिलांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म जागवत आपण कोरोनाशी लढत आहात. आलेल्या संकटाला न घाबरता ताठ मानेने लढण्याची उज्ज्वल परंपरा माँ साहेब जिजाऊ ,रमाबाई आंबेडकर ,सावित्रीमाई फुले ,अहिल्याबाई होळकर या आणि अश्या अनेक स्त्रीयांनी महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर पाऊल ठेवत आपण करत असलेल्या कार्याचा या महाराष्ट्राला देशाला अभिमान आहे. आमच्यासाठी हे कार्य प्रेरणादायी आहे. आपले हे कार्य एखाद्या व्रतापेक्षा कमी नाही. राष्ट्रवादी महिला काँग्रेस या महाराष्ट्राच्या मर्दानीच्या कार्यास सलाम करते. यात प्रामुख्याने महिला डॉक्टर ,नर्स ,पोलीस कर्मचारी ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर यांचा समावेश आहे. यात चाळीसगाव येथील डॉ. अनुराधा खैरनार ( मेडिकल ऑफिसर चाळीसगाव),सौ आशा महाजन( नर्स), सोनी तडवी ( महिला पोलीस कर्मचारी),मंगला माळदकर ( आशा सेविका), सुरेखा चौधरी (अंगणवाडी सेविका) ह्या महिला कोरोना योद्धा आहेत त्यांचा मर्दानी महाराष्ट्राची हे प्रशस्तीपत्र देऊन राष्ट्रवादी काँगेसच्या तालुका अध्यक्षा सौ सोनल साळुंखे यांच्या वतीने करण्यात आला. सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी तालुका उपाध्यक्षा उज्वला पाटील , युवती अध्यक्षा हेमांगी शर्मा ह्या उपस्थित होत्या .गौरव केल्याने त्यांना पुन्हा जोमाने काम करण्याची एक ऊर्जा मिळाली अशी प्रतिक्रिया सर्व महिला कोरोना योद्धा न कडून करण्यात आली.

Protected Content