ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पाचोरा चौफुलीवर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथील राहणारे विलास बाबुलाल चौधरी (वय-४५) हे कामाच्या निमित्ताने भडगाव शहरातील पाचोरा चौकात २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आले होते. रात्री रस्त्यावर वाहनाची वाट पाहत असतांना त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २० सीटी ८०९८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत विलास चौधरी हे जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. याप्रकरणी मयताची पत्नी विजया विलास चौधरी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ विजय जाधव करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!