भोरटेक येथील अपघातप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ झालेल्या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ ते फैजपूर रोड असलेल्या यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ बुधवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता (युपी ८० सीटी ७५३६) क्रमांकाच्या भरधाव ट्रकचे टायर अचानक फुटल्याने ट्रकवरील ताबा सुटल्याने बस (एमएच ४० एन ९०६३) ला जोरदार धडक दिली. या धडकेत बस चालक विजय हिरामन चौधरी (वय-४३) रा. कासार गल्ली, फैजपूर ता. यावल हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर बस चालक विजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सागळे करीत आहे.

 

Protected Content