आ. मिटकरींच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सावद्यात निषेध

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी  आक्षेपार्ह विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या याच्या निषेधार्थ सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समितीच्या वतीने निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुरोहित वर्ग व कन्यादान सारख्या पवित्र विधीबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाले आहे. ब्राह्मण समाजाचा पूर्वीपासूनच शांतताप्रिय आहे, परंतु आमचा स्वभावाचा दुरुपयोग करून आमच्या समाजावर कुरघोडी करून टिप्पणी करण्याचे कारण कट-कारस्थान ही व्यक्ती करत आहे. अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा, अशी मागणीचे निवेदन आज या सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समितीच्या वतीने प्रांताधिकारी फैजपूर यांना देण्यात आले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content