चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात बांधकामानिमित्त परराज्यातून आलेल्या मजुरांची मुलीला समांतर विधी सहाय्यकाच्या मदतीने शाळेत प्रवेश मिळाला आहे.
तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव तसेच समांतर विधी सहाय्यकांच्या मदतीने शाळा सोडलेल्या मुलांना परत शाळेमध्ये दाखल करणेकरिता मोहिम राबवित येत आहे. दरम्यान,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश तथा स्तर चाळीसगाव एन.के.वाळके यांनी न्यायालयाजवळील बांधकाम साईटवर एक परदेशी मजूर कुटुंबासह राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले.त्या कुटूंबातील एक ७ वर्षाच्या मुलीची विचारपूस करता सदर मुलगी शाळेत जात नसून तिचे पालक तिला शाळेत पाठवत नसल्याचे लक्षात आल्याने तात्काळ गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव विलास भोई यांना बोलविण्यात आले. भोई यांनी वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी यांनी एच.एच.पटेल शाळेतील शिक्षक संदेश सखाराम पवार यांना बोलावून घेतले व सदर मुलीस शाळेत दाखल करुन घेतले. तसेच न्यायालयातील शिपाई तुषार भावसार यांच्या मदतीने सदर मुलीस शाळेत दाखल करुन घेण्यास मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.