धरणगाव बसस्थानकावर प्रवाशांसाठी शिवसेनेतर्फे मोफत जलसेवा

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने धरणगाव बसस्थानकावर प्रवाशांसाठी मोफत जलसेवा सुरू करण्यात आली.

धरणगाव येथे अनेक वर्षां पासून तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते दोन वर्षां पासून कोरोनाच्या संकटाने अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता.या वर्षी कोरोना संकट थोड्या फार प्रमाणात कमी झाल्याने मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रत्येक शाखे तर्फे करण्यात आले. त्यानंतर धरणगाव बस स्टॅन्ड प्रवाशांसाठी मोफत जलसेवा शुभारंभ करण्यात आला.

सकाळी सात वाजता सर्व जाती-धर्माच्या समाज बांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पूजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका समाजाचे नव्हते त्यांनी स्वराज्य स्थापने साठी सर्व जाती-धर्माच्या बारा बलूतेदारांना सोबत घेऊन स्थापना केली. आजच्या तरूण पिढीने महाराजांचे विचार अमलात आणून समाज कार्य केले पाहिजे.

या प्रसंगी प्रा.बी एन चौधरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष श्री.विठोबा महाजन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उद्योगपती सुरेशनाना चौधरी, उद्योगपती जीवन अप्पा बयस, चर्मकार समाज कार्याध्यक्ष भानुदास विसावे, धोबी समाज प्रकाश जाधव, छोटू जाधव, मराठा समाजाचे दिलीप मराठे, जयसिंग मराठे, माळी समाज रामकृष्ण महाजन, रतिलाल चौधरी, वाणी समाजाचे विलास येवले, भोई समाजाचे सुनिल जावरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी,उपनगराध्यक्ष विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकरे, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, रतिलाल चौधरी, चंदन पाटील,रामकृष्ण महाजन,गोपाल पाटील, प्रकाश जाधव, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, कीर्ती मराठे, भारतीताई चौधरी, गुलाब मराठे,गोपाल पाटील,,राहुल जैन, पत्रकार जितेंद्र महाजन, राजेंद्र वाघ, धर्मराज मोरे, निलेश पवार, अविनाश बाविस्कर, विजय शुक्ल, बाळासाहेब जाधव, विनोद रोकडे, योगेश पाटील, शिवसेनेचे नगरसेवक , वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, जितेंद्र धनगर, अहमद पठाण, प्रकाश पाटील, रविन्द्र जाधव, बुट्या पाटील, कमलेश बोरसे,दिपक पाटील, नंदु पाटील, धिरेन्द पुरभे, शेखर  माळी, नाना महाजन, भरत महाजन, किशोर पाटील, किशोर पैलवान, गोपाल चौधरी, बापु महाजन, विजय महाजन,राहुल रोकडे,तोशिप पटेल, भैय्या महाजन ,प्रशांत वाणी, दिनेश येवले, समाधान पाटील, सुदर्शन भागवत, हेमंत माळी, अक्षय मुथा, सतिश बोरसे, अरविंद चौधरी, गोलु चौधरी, पप्पू सोनार, तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपजिल्हाप्रमुख पीएम पाटील यांनी तर आभार किरण अग्निहोत्री यांनी मानले. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content