निमखेडी प्रकरणातील गुन्हे मागे घ्या; मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर पंकज कपले । तालुक्यातील निमखेडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यावरून झालेल्या वाद प्रकरणात दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. याप्रकरणी वाद निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने छत्रपतींचा पुतळा हटविला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात ५७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील ९ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ज्या नागरीकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घ्यावे, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती आणि पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे निवेदन देण्यात आले.

Protected Content