पीक अप व्हॅन पलटी : चालकासह दोघे जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील हॉटेल सिंधू गार्डनच्या जवळ चारचाकी पीकअप व्हॅन पलटी झाली असून यात चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत.

धरणगाव शहरातील सिंधू गार्डन जवळ सुरुवातीलाच पहिल्याच तीव्र वळणावर कुलर व फरशीने भरलेली एमएच ०४ जीएफ ९२२० महिंद्रा कंपनीची चारचाकी पिकअप पलटी झाली. पिकअप वाहनाच्या एक्सल रॉड तूटल्याने हा अपघात झाला. यात चालकासह इतर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. धुळे येथून धरणगाव च्या दिशेने फरशी व कुलर भरून वाहन निघाले होते . यावेळी पाटाजवळ गाडीचा एक्सल तुटल्याने अनेक पलटी घेत सिंधू गार्डनच्या मुख्य दरवाजा जवळ थांबली.

या अपघाताचा मोठा आवाज ऐकून लगतचे स्थानिक रहिवासी छोटू जाधव, रविंद्र जाधव, भरत महाजन, कमलेश बोरसे, सिंधु गार्डन चे संचालक साहेबराव महाजन, राहुल रोकडे, आबा पाटील, ज्ञानेश्वर पांडुरंग माळी, मधुकर माळी, गजानन महाजन, मुन्ना पाटील यासह सामाजिक कार्यकर्ते समाधान मोरे, भैय्या पाटील, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पिकअप मध्ये अडकलेले चालक पप्पू माने, पवन मराठे व सचिन बागुल इतर दोन जणांना बाहेर काढले. या अपघातात चालक पप्पू माने वय -३१ , रा. शिवाजी नगर जळगाव, पवन मराठे, सचिन बागुल, दोन्ही रा. धरणगाव यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: