रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘खेलो इंडीया खेलो’ मध्ये सुवर्ण पदक पटकावणार्या रावेर येथील खेळाडू गोविंदा महाजन याला आज महाराष्ट्रा दिना निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार म्हणून जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे खेळाडू गोविंदा सुनील महाजन याला क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२१ चा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर केला होता.
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार खेळाडु गोविंदा महाजन यांनी स्वीकार त्याला प्रशिक्षक म्हणून योगेश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोविंदा सुनील महाजन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.