मेहरूण येथे चौघांकडून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील मेहरून येथील जय जवान चौकात तरुणाला मागील भांडणाच्या कारणावरून चार जणांनी बेदम मारहाण केली. तर एकाने डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गजानन मांगो वंजारी (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हा तरुण शनिवारी १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मेहरूणमधील जय जवान चौकातजवळील एका दुकानावर बसलेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून दिनेश भागवत चाटे, मयूर जगदीश चाटे, शुभम चंद्रकांत वंजारी आणि ऋषिकेश जगदीश चाटे सर्व रा. जय जवान चौक, मेहरून यांनी गजानन याला बेदम मारहाण केली. तर एकाने हातातील लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत गजानन वंजारी याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता गजानन वंजारी यांनी दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी दिनेश भागवत चाटे, मयूर जगदीश चाटे, शिवम चंद्रकांत वंजारी आणि ऋषिकेश जगदीश चाटे या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content