मुक्ताईनगरात व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारिणी जाहीर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय विश्रामगृहावर व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची कार्यकारिणीचे नुकतेच गठन करण्यात आले. सदर सभा संत मुक्ताई पत्रकार मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष मराठे तर सचिवपदी विनायक वाडेकर यांची निवड करण्यात आली.

 

सदर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्षपदी संतोष मराठे, उपाध्यक्षपदी अमोल वैद्य व मोहन मेढे, सचिवपदी विनायक वाडेकर, कोषाध्यक्षपदी संदीप जोगी, सहसचिव पदी प्रवीण भोई व राजेश पाटील, संघटक पदी मुकेश महल्ले, सदस्यपदी दीपक चौधरी, संजय वाडीले, देवेंद्र काटे, छबीलदास पाटील, महेंद्र पाटील  यांची निवड करण्यात आली. याबद्दल व्हाईस ऑफ मीडियाचे  जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, संत मुक्ताई पत्रकार मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे,सल्लागार मतीन शेख,  विकास चौधरी यांच्यातर्फे तसेच गणेश भोम्बे आणि तालुक्यातील पत्रकारांतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content