Home क्राईम भुसावळात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

भुसावळात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा भिशीचे पैसे देण्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील २३ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भिशीचे पैसे देण्याच्या कारणावरून एकाने दारूच्या नशेत येऊन महिलेला शिवीगाळ व मारहाण करत गंभीर दुखापत करून अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी जाफर शेख रा. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक तुषार इंगळे करीत आहे.


Protected Content

Play sound