Home क्राईम रावेरच्या मेन रोडवर घरफोडी ; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

रावेरच्या मेन रोडवर घरफोडी ; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

0
4


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील मेन रोडवरील एका घराचे दरवाजाचे बिजागरे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेन रोडवरील कल्पना सुभाष वाणी यांच्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे बिजागरे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तूंची तपासणी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घरफोडीत सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकीट, एक लाख रुपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच ५० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर याबाबत कल्पना वाणी यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound