अवैध गौण खनिज वाहतूक करणारा डंपर पकडला

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तिरपोळे येथून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या एका डंपरला महसूल पथकासह पोलिसांनी काल पकडले असून याबाबत अजून मेहूणबारे पोलीस स्थानकात नोंद झालेली नाही.

तालुक्यातील तिरपोळे येथून अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव महसूल पथकासह मेहूणबारे पोलिसांना मिळाली. त्यावर सापळा रचून त्या डंपरला (एम.एच.२० जीसी ०३४१) पकडण्यात यश आले आहे. सदर कार्यवाही चाळीसगाव महसूल व मेहूणबारे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने काल सायंकाळी करण्यात आली आहे.

याप्रसंगी सुनिल पवार (मंडळ अधिकारी- मेहूनबारे) पवन शेलार (तलाठी), बागुल (तलाठी), नयना ब्राम्हणे (तलाठी), व मेहूनबारे पोलीस स्थानकाचे सपोनि संदिप परदेशी, सहा फौ मिलिंद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गोरख चकोर, निलेश लोहार, जितु परदेशी आदी उपस्थित होते.

Protected Content