मुक्ताईनगरात कॉंग्रेसतर्फे प्रशासनाला निषेधाचे निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आज कॉंग्रेसची बैठक पार पडली. यानंतर दिल्लीतील घटनेबाबत निषेधाचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

आज मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक जिल्हा सरचिटणीस संजय पाटील कुर्‍हा यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर जगदीश पाटील ऍड.अरविंद गोसावी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नागपूर येथे होणार्‍या कॉंग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने जाहीर सभेच्या कार्यक्रमात जाण्यासाठी नियोजन करण्यात आले. तसेच संसदेत बेरोजगार तरुणांनी भाजपच्या लोकसभा सदस्याच्या स्वाक्षरीने संसदेत प्रवेश करून जो भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधाचे निवेदन व लोकसभेत विरोधी पक्षाच्या लोकसभासदस्य व राज्यसभा सदस्य यांना लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या संगनमताने सभागृहातून निलंबित केले त्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी तसेच महिला तालुकाध्यक्ष मनिषा कांडेलकर, महिला शहराध्यक्ष ज्योती धामोडे, तालुका उपाध्यक्ष बाळूभाऊ कांडेलकर, संजय धामोडे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव महाराज पाटील सांस्कृतिक विभाग, जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, नामदेव भोई, भाऊराव बोदडे, जनार्दन बोदडे, अमोल पाटील बोदवड, ज्ञानेश्वर इंगळे, श्रावण तायडे, अजय पाटील, संतोष पाटील, निखिल चौधरी श्रावण तायडे,सचिन तायडे, कार्याध्यक्ष राजू जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

Protected Content