घरकुल लाभार्थ्यांबाबत चौकशी होण्याची मागणी

 

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या घरकुल लाभार्थ्याचे प्राधान्य क्रमांकाने आलेले नाव डावलून इतरांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी चौकशी करावी, अशी मागणी अनेक लाभार्थी बांधवांकडुन होत आहे.

यासंदर्भातील अशी की यावल तालुक्यातील घरकुल योजनेसाठी सन२०२१ पासून यावल पंचायत समितीच्या फेर्‍या मारत आहेत २०२१ च्या घरकुल प्रस्तावामध्ये विविध ग्रामपंचायतीमध्ये नाव प्राधान्याने यादीनुसार आलेली असून ग्रामपंचायतीने प्रस्ताव कसा? पंचायत समितीकडे पाठवलेला आहे मात्र या मंजूर यादीमधून लाभार्थ्याचे नाव डावलून त्याच्या खालील इसमाचे घरकुल मंजूर झालेले बांधकाम ही झाले मात्र याच्यावर अन्याय झाल्याचे दिसत असुन अर्थपुर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा आहे.

याबाबत ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवलेल्या अनुसार आम्ही मंजुरी देतो असे सांगून हात .वर केले प्राधान्य क्रमांकाने अशा लाभार्थ्यचे नाव असताना त्याचे नाव डावलले . या मागील नेमका हेतू काय असा? प्रश्न आता पुढे आलेला असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यावल येथे एक दिवस येऊन प्रत्यक्ष चौकशी करावी अशी मागणी आहे.

यासंदर्भात तालुक्यात झालेल्या ग्रामसभेमध्ये मंजूर लाभार्थ्यांची नावांचे वाचन ही झाली होती तात्काळ प्रायोरिटी लिस्टमधील अनुसूचित जमाती संवर्गाच्या पात्र कुटूंबाची यादी ग्रामसभा झाली होती त्याच्या ठरावाची प्रत ची तपासणी गटविकास अधिकारी यांनी करावी त्यात जी घरकुलांची बांधकाम झाली व प्राधान्य क्रमांकातील पात्र लाभार्थ्यांना डावलून त्यांचे बांधकाम सुरू आहे हे नेमके कसे मंजूर झाले? असा प्रश्न आता समोर आलेला आहे यावल पंचायत समिती असा घोड सुरू असून या झालेल्याघोडाला नेमका आशीर्वाद कुणाचा ?असा प्रश्न उपस्थित होत आहे तालुक्यात किती गावांना असा घोड झालेला आहे? यासंदर्भात यावल पंचायत समितीच्या एका पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केल्याचे समजते यावेळी या घरकुल प्रस्तावाची फाईल मात्र ज्या घरकुल लाभार्थ्यांची नावाची तक्रार झाली त्याची फाईल 30 ऑगस्ट रोजी सकाळपासून तपासण्यात आली मात्र ती गवसली नव्हती ती गहाड झाली कशी? बाकी सर्व फाईल व्यवस्थित आहेत यामागील अर्थ काय? याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Protected Content