पाचोऱ्यात डॉक्टरांची माणुसकी : गंभीर जखमी कर्मचार्याचे केले तत्काळ ऑपरेशन

पाचोरा ( प्रतिनिधी ) अपघातात गंभीर जखमी झालेल्या साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या रुग्णावर पैशांची अट न घालता तत्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचवण्याची कामगिरी आज येथील दोन डॉक्टरांनी केली असून आपल्या कृतीतून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तहसील कचेरीत कार्यरत असलेले कर्मचारी अनिल जंजाळ यांचा पाचोरा रेल्वे स्थानकावर भुसावळकडुन येणाऱ्या शटलमधुन उतरताना अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी असता त्यांना रेल्वे पोलीस ईश्वर बोरुडे आणि अ‍ॅम्ब्युलन्स चालक बबलु मराठे यांनी तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी रक्तश्राव अधिक होत असल्यामुळे तात्काळ विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यावेळी प्राथमिक उपचार डॉ. सागर गरुड व डॉ. भुषण मगर यांनी केले. घटनेचे वृत्त समजताच कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी तातडीने भेट देऊन जंजाळ यांच्या परीवाराला धीर दिला तर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे यांनी डॉ. सागर गरुड यांची भेट घेऊन काहीही करुन जंजाळ यांचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा अशी विनंती केली. डॉक्टरांची माणूसकी – दरम्यान अचानक झालेल्या प्रसंगात जंजाळ यांचा परीवार हतबल झाला होता. याचवेळी जखमी अनिल जंजाळ यांचे तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे होते नियमाप्रमाणे ऑपरेशन आधी हॉस्पिटलच्या काउंटरवर पन्नास हजार रुपये भरणे गरजेचे होते, मात्र डॉ. सागर गरुड यांच्या दालनात प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसेसह कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांना रुग्णाची संपूर्ण परीस्थिती डॉ. गरुड यांनी सांगितली असता रुग्णाच्या परीवाराची परीस्थिती बघता पैसे आताच भरावे की नंतर भरले तरी चालेल असे बोलल्यावर क्षणाचा विंलब नकरता डॉ. गरुड यांनी पैसे नंतर भरले तरी चालेल आधी रुग्णाचा जीव वाचवतो. असे नि:संदिग्धपणे सांगितले.

पाच तासांचे ऑपरेशन यशस्वी

गंभीर अवस्थेत असलेल्या अनिल जंजाळ यांना लागणारे रक्तातील घटक आणि रक्त हे तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्सने जळगांवहुन मागवले. असता डॉ. सागर गरुड, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. संदीप इंगळे यांनी तब्बल पाच तास चाललेले ऑपरेशन यशस्वी झाले असुन अनिल जंजाळ हे अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहेत.

Add Comment

Protected Content