Home क्राईम तरूणीवर अत्याचार करत केली फसवणूक

तरूणीवर अत्याचार करत केली फसवणूक

0
43


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे राहणाऱ्या २९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार देवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई शहरातील कोरेगाव परिसरात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तरूणीची पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अभिषेक रोकडे यांच्याशी फेब्रुवारी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली. ओळखीचा फायदा घेवून अभिषेकने तरूणीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तो नगरदेवळा येथे निघून आला. दरम्यान, लग्न करण्यासंदर्भात पिडीत तरूणी ही नगरदेवळा येथे तरूणाच्या घरी आली. त्यावेळी अभिषेक रोकडे व त्याची आई अभिलाषा रोकडे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. पिडीत तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी अभिषेक रोकडे व त्याची आई अभिलाषा रोकडे यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound