कोरोना ; यावल तालुका ६०० च्या उंबरठ्यावर

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोनाविषाणू संसर्गाचे आजाराने ६०० च्या जवळ बाधित रुग्णांचा आकडा पोहचला असून यावल तालुक्यात आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढणारी ही रुग्णांची आकडेवारी आहे . यामुळे आरोग्य प्रशासकीय यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर सतर्क झाल्याचे दिसून येत आहे .

दरम्यान आज यावल तालुक्यात मागीत २४ तासामध्ये ४० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यात चिखली बुद्रुक येथे आठ रुग्ण , चुंचाळे गाव येथे पाच रुग्ण , साकळी गावात एक , कोळवद गावात तीन, पाडळसा गावात तीन असे रुग्ण मिळाले . १५ ऑगस्ट रोजी कोळवद गावात ७ रूग्ण , शिरसाड येथे ५ रूग्ण , किनगाव२ आणी न्हावी येथे २ नवीन कोरोना बाधीत रुग्ण मिळाले असून रुग्णांचा आकडा ५९१ एवढा झाला यातील ३९लोकांचा मृत्यू झाला असून ४१५ रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत १३८ रुग्णांवर कोविड सेंटरला उपचार सुरु आहे यावल तालुक्यात कोरोना बाधित ५७५ रुग्णांमध्ये ४२८ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत ३९ मरण पावलेल्या पैकी २५ रुग्ण ग्रामीण भागातील असून १४ रुग्ण आहे शहरी भागातील आहेत . कोविड सेंटरला उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांमध्ये १०६ रुग्ण हे ग्रामीण परिसरातील असून पंधरा रुग्ण शहरी भागातील आहेत .

Protected Content