पत्रकार अय्युब पटेल यांचा जनजागृतीपर लिखाणासाठी सन्मान

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत जनजागृतीपर लिखाणाच्या माध्यमातून मोलाची कामगिरी करणारे लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी अय्यूब पटेल यांना सन्मानित करण्यात आले.

देशावर आणी संपुर्ण राज्यामध्ये थैमान घालणार्‍या कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटासमयी शासनाने लॉकडाऊनचे नियम लागु केले आहेत. गत सुमारे पाच महीन्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरीकांमध्ये कोरोना या आजारा विषयी जनजागृती करण्याकामी प्रशासकीय पातळीवर योग्य ती काटेकोर दखल घेतली गेली. आणी शासनाच्या नियमांना नागरीकांपर्यंत कोरोनाच्या घातक अशा आजाराशी लढा देत ज्यांनी आपल्या लेखणीतुन योगदान दिले अशा यावल तालुक्यातील पत्रकार बांधवांना महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या पुढाकाराने सन्मानपत्र देवुन सन्माननित करण्यात आले.

यावलच्या तहसील कार्यालयातील सभागृहात १५ ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेन्द्र कुवर तर निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आदी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

यावेळी कोरोना विषाणु महामारीच्या आपत्तीमध्ये सामाजीक बांधीलकी जपत आपल्या निर्भीड लेखणीतुन संकटात जनजागृती करण्यासाठी व कोरोना विरूद्धचा लढा जिंकण्यासाठी जिव धोक्यात घालुन कार्य केल्याबद्दल लाईव्ह ट्रेंड न्युज चे तालुका प्रतिनिधी अय्युब पटेल यांचा तहसीलदार जितेन्द्र कुवर व प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्रे देवुन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी मानले.

Protected Content