संतापजनक : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली आणि डोळे फोडले !

लखीमपूर (वृत्तसंस्था) एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. भयंकर म्हणजे नराधम आरोपींनी पिडीत मुलीची हत्या करण्यापूर्वी जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते.

 

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली. त्यानंतर उसाच्या मळ्यात तिचा मृतदेह सापडला. शेताकडून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केले. जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते आणि शेतात मृतदेह फेकून दोघंही तरुण फरार झाले. शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, पिडीत मुलीचे बलात्कारानंतर आरोपी भयंकर हाल केल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली होती.

Protected Content