विद्यार्थ्यांचे मूलभूत ज्ञान व क्षमता कॅम्पस निवडीसाठी महत्वाचे – मोहन पाठक

campus interveiw

भुसावळ प्रतिनिधी । कॅम्पस मुलाखत ही खरं तर करिअरच्या आभाळात प्रवेश करण्याची मिळालेली संधी असते. उमेदवार निवडीच्या वेळेस जोखले जाते ते विद्यार्थ्यांचे संबंधित विषयातील मूलभूत ज्ञान आणि या ज्ञानाचे उद्योगक्षेत्रात उपयोजन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता त्याचा दृष्टिकोन, लवचिकपणा, संबंधित क्षेत्रातील उद्योगक्षेत्राबाबत त्याचे अद्ययावत ज्ञान याची चाचपणी करतात आणि अत्यंत चोखंदळपणे या कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करतात, अशी माहिती औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन कंपनीचे एचआर मॅनेजर मोहन पाठक यांनी मुलाखत पूर्व मार्गदर्शनात सांगितले. भुसावळात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलाखत शिबीरात बोलत होते. प्रसंगी एचआर टीम सदस्य विनायक मूळ, वृषभ आवाले, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.आय.डी. पॉल उपस्थित होते.

 

 

धूत ट्रान्समिशनमध्ये ७२ विद्यार्थ्यांची निवड
धूत ट्रान्समिशनतर्फे महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभाग, इलेक्ट्रिकल विभाग, मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ७२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मोठ्या कंपन्या विद्यार्थी-उमेदवार निवडताना नेमका कशावर भर देतात, हे विशद केले. त्यांनी सांगितले की, विषयासंबंधित मूलभूत ज्ञान, विद्यार्थ्यांचा आवाका, कल याचा अंदाज आल्यानंतर मुळात संबंधित क्षेत्राविषयीची त्या विद्यार्थ्यांची पॅशन जोखली जाते. त्या क्षेत्रात जीव ओतून काम करण्याची, नवनवे शिकत राहण्याची आणि संस्थेच्या उत्कर्षांसाठी काम करण्याची उमेदवाराची वृत्ती आहे का, हे ध्यानात घेतले जाते. इलेक्ट्रॉनिक्स अंड टेलिकॉम, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल विभागाच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीनतम तंत्रज्ञान सेटअपसह, ऑटोमोटिव्ह ओइएम ग्राहकांना ग्लोबल, सिंगल पॉइंट सोर्सिंग, इलेक्ट्रोनिक हार्डवेअर, एम्बेडेड सॉफ्टवेअर, 3 डी मॉडेलिंग आणि टेस्टिंग, उत्पादन आणि एसएमटी लाइन सेटअपसह घरगुती सुविधा, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करण्याची संधी असेल. या मुलाखतींमधून विद्यार्थ्यांची निवड करून कंपनीतर्फे त्यांना आकर्षक पगारावर नोकरी दिली जाणार आहे. साधारणपणे १.२ लाख ते २.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्नापर्यंतच्या पॅकेजेसवर विद्यार्थ्यांची निवड केली गेली. सध्या सर्वच क्षेत्रात मुलींची वरचढ आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगसुद्धा क्षेत्रात मुलींनी आपले स्थान कायम ठेवत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
महाविद्यालयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अंड टेलिकॉम विभागाच्या मुलींची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. या संख्येची सरासरी काढल्यास 75 टक्के मुली तर 25 टक्के मुलांची निवड झाली आहे.  प्रा.स्मिता चौधरी, प्रा.गौरव टेम्भुर्णीकर, प्रा.किशोर पाटील, प्रा.राम अग्रवाल, प्रा.युवराज परदेशी, प्रा.जयेश महाजन यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष ॲड. एम.डी. तिवारी, कार्याध्यक्ष एस.आर. गोडयाले, बी.टी. अग्रवाल, पंकज संड, संजय नाहाटा व सर्व हिंदी सेवा मंडळ पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांनी अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content