अविश्वसनीय सावरकर-माझी दृष्टी “भगूर ते अंदमान” ; कलाशिक्षक वाय. आर. पाटलांचे चित्रप्रदर्शन

 

भडगाव, प्रतिनिधी । येथील जी. एस. हायस्कूल मधील कलाशिक्षक वाय. आर. पाटील यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे भगूर येथे नुकतेच उद्घाटन झाले. या प्रदर्शनात एकूण तीस चित्रांचा समावेश आहे.प्रत्येक चित्रातील रेषा बोलकी असून रंगांची पखरण अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे

नाशिक येथील  शब्दमल्हार संपादक स्वानंद बेदरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते म्हणाले,” स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार घेऊन जीवन प्रवास म्हणजे एक दुर्दम्य आत्मविश्वास आहे. जो कोणी त्यांचे विचार अंगी बाळगेल त्याचे जीवन बदलून आपोआप त्यावर राष्ट्रप्रेमाचे संस्कार घडतील. रंग आणि रेषांच्या माध्यमातून वाय. आर. पाटील यांनी सावरकरांना मांडले ही खूप मोठी गोष्ट आहे. सावरकरांचे १०० पेक्षाही जास्त पैलू आहेत. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या चित्र प्रदर्शनातून सावरकरांना घरोघरी पोहोचविणे हा हेतू पाटलांचा प्रशंसनीय आहे. पाटील सरांमध्ये झालेला बदल यावरून दिसून येतो” असे प्रतिपादन बेदरकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर श्रेयस मेडिकल फाउंडेशन, पाचोराचे प्रमुख डॉ.जयंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. तर मातोश्री सुमित्राबाई पाटील, राजीव पाटील, जेष्ठ शिक्षक ए. बी. पाटील, मनोज कुंवर, सुदाम वालझाडे, भगूर, उपनगराध्यक्ष, पुरातत्व सहा.संचालक आरती काळे,  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय नेवे यांनी केले. भगूर पुत्र वीर सावरकर समूहाचे संभाजी देशमुख ,सुदाम खाडे, मंगेश मरकड, संतोष मोजड, प्रमोद आंबेकर, जागृती नेवे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी कळसूत्रकार प्रा. दिनेश साळुंखे, जेष्ठ कलाशिक्षक दीपक श्राॅफ, चित्रकार पिसुर्वो, सिनेमॅटोग्राफर दिनेश लहासे, भगवान बारी आदी उपस्थित होते.

Protected Content